मंगळवेढा शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या श्री संत चोखामेळा चौकातील पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर असणाऱ्या अमोल रत्नपारखी ज्वेलर्समध्ये नोकर भरती सुरू असल्याने मंगळवेढा व परिसरातील तरुणांना मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
अनेक पिढ्यांची विश्वसनीय परंपरा असलेल्या व ग्राहकांची प्रथम पसंती असलेल्या मंगळवेढा शहरातील अमोल रत्नपारखी ज्वेलर्स या शोरूम मध्ये नोकर भरती होणार असल्याची माहिती अमोल रत्नपारखी ज्वेलर्सचे सर्वेसर्वा अमोल रत्नपारखी यांनी दिली.
अमोल रत्नपारखी ज्वेलर्स ही सुवर्णपेढी मंगळवेढ्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून ग्राहकांच्या सेवेत असून या सुवर्णपेढीवर ग्राहकांनी मोठा विश्वास दाखवला आहे. अमोल रत्नपारखी यांनी या सुवर्णपेढीची सूत्रे हातात घेतल्यापासून अनेक अमुलाग्र असे बदल केले आहेत. नुकतेच या शोरूमचे अतिशय आकर्षक असे नूतनीकरण करण्यात आल्याने शोरूमचे रूपच पालटले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सेवा देण्याचा या सुवर्णपेढीचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. नुकत्याच झालेल्या दिवाळी ऑफरला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने या शोरूमवरचा ग्राहकांचा असलेला विश्वास अधिकच दृढ झाला आहे.
या शोरूम मध्ये सेल्स आणि मार्केटिंग प्रतिनिधी या पदासाठी चार जागा भरावयाचे असून उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. उत्तम व्यक्तिमत्व आणि संभाषण कौशल्य असणे गरजेचे आहे. या पदासाठी आकर्षक पगार इन्सेंटिव्ह आणि इतर भरपूर सुविधाही मिळणार आहेत. या पदाच्या मुलाखतीसाठी इच्छुकांनी बायोडेटासह शोरूम मध्ये सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत समक्ष येऊन भेटावे आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अमोल रत्नपारखी ज्वेलर्सच्या संचालिका सौ. श्रद्धा अमोल रत्नपारखी यांनी केले आहे.