टीम लोकमन मरवडे |
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे ता. मंगळवेढा येथे शुक्रवार दिनांक १९ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. मेघा महिंद्रकर यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी १० ते २ यावेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, मरवडे याठिकाणी होणाऱ्या या शिबिरामध्ये मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. मनीष बसंतवाणी, अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, बालरोग तज्ञ डॉ. महेश कोनळळी, बालरोग तज्ञ डॉ.शशिकांत वाली, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. पुष्पांजली शिंदे, डॉ. सौ. मेघा महिंद्रकर, डॉ. करण राजपूत हे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत.
वारंवार धाप लागणे, छातीत दुखणे, पायऱ्या चढताना दम लागणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिरामध्ये येऊन तपासणी करून घ्यावी. या शिबिरामध्ये रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) इत्यादी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. नामांकित अशा नागपूर येथील एम्स हॉस्पिटल मधील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. मनीष बसंतवाणी यांनी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे रुजू झाल्यापासून अनेक हार्ट ॲटॅक आलेल्या रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. अल्पावधीतच ते मंगळवेढा परिसरात लोकप्रिय झाले आहेत. ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल अशा रुग्णांच्या छातीत दुखत असेल तर त्यांनी या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी करून घ्यावी कारण अशा रुग्णांमध्ये हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते. गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, टाचदुखी, हातदुखी यासह हाडांच्या विविध समस्यांवर निदान व उपचार, लहान बालकांची मोफत आरोग्य तपासणी, महिलांचे सर्व प्रकारचे आजारांवर मोफत तपासणी या शिबिरात होणार आहे.
१९ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, मरवडे येथे सकाळी १० ते २ यावेळेत होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक भारत शिंदे, मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, या शिबिराचे समन्वयक संतोष कोळसे यांनी केले आहे.