बेगमपूर : सतीश पाटील
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे वतीने बेगमपूर ता. मोहोळ येथे रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. पुष्पांजली शिंदे यांनी दिली.
रविवारी सकाळी १० ते २ यावेळेत ग्रामपंचायत हॉल बेगमपूर याठिकाणी होणाऱ्या या शिबिरामध्ये मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. मनीष बसंतवाणी व सोलापूर येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर सुनील शेवाळे हे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. वारंवार धाप लागणे, छातीत दुखणे, पायऱ्या चढताना दम लागणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिरामध्ये येऊन तपासणी करून घ्यावी.
या शिबिरामध्ये रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) इत्यादी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. नामांकित अशा नागपूर येथील एम्स हॉस्पिटल मधील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. मनीष बसंतवाणी यांनी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे रुजू झाल्यापासून अनेक हार्ट ॲटॅक आलेल्या रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. अल्पावधीतच ते मंगळवेढा परिसरात लोकप्रिय झाले आहेत. ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल अशा रुग्णांच्या छातीत दुखत असेल तर त्यांनी या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी करून घ्यावी कारण अशा रुग्णांमध्ये हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते.
या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उद्योजक दत्तात्रय चव्हाण यांच्या हस्ते व मिस्टर सरपंच सोमनाथ कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असलम चौधरी, पांडुरंग काकडे, बाळासाहेब तांबोळी, संजय विभुते, डॉ. बाळासाहेब सरवळे, केशव काकडे, हरिभाऊ काकडे, संजय आराध्ये, श्रावण गवळी गुरुजी, हनुमंत कावळे, आरिफ पठाण, जयंत कुलकर्णी, सोमनाथ म्हेत्रे, बालाजी लोहकरे, लखन माने, उमाकांत कावळे, अक्षय सुरवसे, बेगमपूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हरीश पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, डॉ. प्रवीण नागणे, डॉ. अमोल बुरांडे, डॉ. सुधाकर मोहोळे, डॉ. किरण सलगर, डॉ. प्रसाद काकडे, डॉ. मयूर काकडे, डॉ. प्रदीप डोके, डॉ. नितीन सलगर, डॉ. तौफिक मुलाणी, डॉ. सचिन जगताप, डॉ. मंदा नागणे, डॉ. नीलिमा बुरांडे, डॉ. सुचिता चव्हाण हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
२१ एप्रिल रोजी सकाळी १० ते २ यावेळेत होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. मेघा महिंद्रकर, डॉ. करण राजपूत, व्यवस्थापक भारत शिंदे, मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, समन्वयक संतोष कोळसे, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ हेगडे यांनी केले आहे.