टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढ्यातील तीन युवा उद्योजकांनी एकत्र येऊन मंगळवेढा सांगोला रोडवरील काळा खडक येथे सुरू केलेल्या हॉटेल आयपीएल ग्रँड फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ आज सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी सुनिता बलभीम इंगळे, सुमन भगवान लिगाडे, रंजना महेश पवार यांचे अमृतहस्ते होणार असल्याची माहिती हॉटेलचे संचालक उदयसिंह इंगळे यांनी दिली.
शाकाहारी व मांसाहारी साठी स्वतंत्र किचन आणि ग्राहकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असलेले हे मंगळवेढ्यातील पहिलेच रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंट मध्ये गार्डन, डायनिंग व पार्टी हॉलची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रीयन, वेस्टर्न, साउथ इंडियन नाष्टा, चायनीज, सी-फुड, स्पेशल शिक कढाई, पंजाबी डिशेष, कॉन्टिनेन्टल, मेक्सिकन, पिझ्झा, बर्गर, मॉकटेल्स, आईस्क्रीम यांचेसह विविध नवनवीन व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची रेलचेल असणार आहे. २०१९ चा वर्क इन इंडिया हॉस्पिटॅलिटी आयकॉन पुरस्कार विजेते मास्टर शेफ पातुर हे या रेस्टॉरंटमध्ये सेवा देणार आहेत. या रेस्टॉरंटचे नाव आयपीएल असून त्याची कहाणीही तितकीच रंजक आहे. या हॉटेलचे तीन पार्टनर असून इंगळे, पवार आणि लिगाडे या तिघांच्याही आडनावातील पहिले एक अक्षर घेऊन इंगळे-I, पवार-P, लिगाडे-L घेऊन आयपीएल हे नाव रेस्टॉरंटला देण्यात आले आहे.
आज सायंकाळी हॉटेलच्या होणाऱ्या या उद्घाटन समारंभासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे-पाटील, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोलाचे माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे, जिजामाता परिवाराचे संस्थापक रामकृष्ण नागणे, जकराया शुगरचे चेअरमन ॲड. बिराप्पा जाधव, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, उद्योजक महादेव नागणे, मुढवीचे माजी सरपंच कल्याण रोकडे, शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष ॲड. सुजित बापू कदम, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव, करवीर जि. कोल्हापूर येथील तहसीलदार स्वप्नील रावडे, इंदौरचे उद्योजक सोनू शिंदे, वाटंबरे येथील उद्योजक आप्पासो गव्हाणे, पाचेगाव येथील उद्योजक नानासो मिसाळ, प्रगतिशील बागायतदार अशोक भोसले, उद्योजक अरविंद सावंत, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी डॉ. माणिक पवार, सिद्धेश्वर भोसले सर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवेढा सांगोला रोडवर मंगळवेढा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील काळा खडक येथे साकारलेल्या हॉटेल आयपीएल ग्रँड फॅमिली रेस्टॉरंटच्या शुभारंभासाठी मंगळवेढा व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रेस्टॉरंटचे संचालक उदयसिंह इंगळे, महेश पवार, प्रभाकर लिगाडे यांनी केले आहे.