टीम लोकमन सोलापूर |
सोलापूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी त्या 54 वर्षांच्या होत्या.
त्यांनी आजपर्यंत संचार, लोकमतसाठी लिखाण केले. आकाशवाणी आणि आजतक चॅनलसाठीही काम केले आहे. लोकमत सोलापूरचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या त्या धर्मपत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई अन् दोन नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचेवर आज सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर मनोहर सपाटे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, अजय दासरी यांचेसह राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार उदयनराजेंकडून सांत्वन
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, भारतीय जनता पार्टीचे नेते व सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सायली जवळकोटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांनी दूरध्वनीवरून सचिन जवळकोटे यांचे सांत्वन केले आहे.