टीम लोकमन सांगोला |
रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष, सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक, सांगोला येथील दलित चळवळीतील धडाडीचे युवकनेते सुरजदादा बनसोडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोलापूर येथील खाजगी रूग्णालयात सायंकाळी 6 वाजणेच्या सुमारास उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
मृत्यूसमयी ते 44 वर्षाचे होते. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण, भावजय, चुलते, मेहुणे असा मोठा परिवार आहे. दलित चळवळीतील अत्यंत धडाडीचा, परखड, स्पष्टवक्ता नेता म्हणून सुरजदादा बनसोडे यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे दलित चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुका व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता सांगोला भिमनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून सांगोला येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.