टीम लोकमन मंगळवेढा |
रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड मंगळवेढा या बँकेचे कर्जदार गणपत तुकाराम कोळेकर रा. तळसंगी ता. मंगळवेढा यांनी बँकेच्या कर्जफेडीकरिता दिलेला धनादेश अनादर झाल्या प्रकरणी मंगळवेढा येथील फौजदारी न्यायाधीश एस. एन. गंगवाल-शाह यांनी नऊ महिने कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई ६ लाख रुपये त्यावर दिनांक ८ जून २०१८ पासून दरमहा ६ टक्के व्याज संपूर्ण रकमेची परतफेड होईपर्यंत देण्याचा आदेश केला. तसेच नुकसान भरपाई सदर बँकेस न दिलेस आणखी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, गणपत तुकाराम कोळेकर यांनी रतनचंद शहा सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या परतफेडीसाठी रतनचंद शहा सहकारी बँकेस धनादेश दिला होता. सदरचा धनादेश आरोपीच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे अनादर झाला. त्यानंतर बँकेने मंगळवेढा न्यायालयात फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीची चौकशी होऊन आरोपी गणपत तुकाराम कोळेकर यांना न्यायाधीश श्रीमती एस. एन. गंगवाल-शाह यांनी नऊ महिने करावासाची शिक्षा व नुकसान भरपाई ६ लाख रुपये व त्यावर दिनांक ८ जून २०१८ पासून दरमहा ६ टक्के व्याज संपूर्ण रकमेची परतफेड होईपर्यंत देण्याचा आदेश केला व नुकसान भरपाई बँकेस न दिल्यास आणखी सहा महिने करावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणी रतनचंद शहा सहकारी बँकेतर्फे फिर्यादी म्हणून श्रीकांत नाझरकर यांनी जबाब दिले. तर रतनचंद शहा सहकारी बँकेच्या वतीने ॲड. जावेद डी. मुल्ला यांनी कामकाज पाहिले.