सोलापूर : सुरज राऊत
सोलापूर येथील यूनियन बॅंकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोन मेळाव्यास ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून या मेळाव्यात बँकेच्या ग्राहकांना विविध कारणांसाठी तब्बल आठ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती युनियन बँकेच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक अभिषेक खडतरे यांनी दिली.
हा लोन मेळाव्याचा कार्यक्रम सोलापुरातील गांधीनगर युनियन बँक ऑफ इंडिया कॅम्प शाखेत झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव दलाचे पोलिस उपाधीक्षक नानासाहेब विठ्ठल मासाळ, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपप्रादेशिक अधिकारी सुभाष गजभिये, सोलापूर शाखा व्यवस्थापक ललित गोरख, जोडभावी पेठचे शाखाधिकारी विक्रमशील पाटील, मुख्य शाखेचे व्यवस्थापक प्रशांत सुरेकर, सोलापूर कॅम्प शाखेचे अधिकारी विक्रम जंगले व रोहित कदम, सोलापूर क्रॉसरोडचे मॅनेजर सूरज गोडगे, मुख्य शाखेचे व्यवस्थापक अभिषेक खडतरे, हरिका बोमेना आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बांधकाम व्यावसायिक पीपी डेव्हलपर्स, क्राउन रेसिडेन्सी यांना गृहकर्जे व कार डीलर्स स्टर्लिंग मोटर्स, चव्हाण मोटर्स यांना कर्ज वाटप झाले. तसेच सोलार रुफ टॉप योजनेतही कर्ज वाटप करण्यात आले. या लोन मेळाव्यामध्ये एकूण ८ कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. प्रास्ताविक शाखेचे व्यवस्थापक अभिषेक खडतरे यांनी केले.