टीम लोकमन मंगळवेढा |
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती मंगळवेढा व विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर मंगळवेढा येथे योग दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर एम. एस. आझमी साहेब व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यु. पी. देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती मंगळवेढा व विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर मंगळवेढा येथे श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा यांचे अध्यक्षतेखाली व सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा श्रीमती. व्ही. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर येथील आचार्य नारायण गुरुजी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मंगळवेढा तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी अकील दरवाजकर, मंगळवेढा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. उल्हास माने, उपाध्यक्ष ॲड. व्ही. वाय. बेदरे, सचिव ॲड. जावेद डी. मुल्ला, सरकारी वकील डी. ए. बनसोडे, सरकारी वकील आर. एल. बामणे, ॲड. आर. डी. कुलकर्णी, ॲड. डी. एस. माने, ॲड. रविकिरण कोळेकर, ॲड. दत्तात्रय तोडकरी, ॲड. आर. आय. शेख, ॲड. सुजय लवटे, ॲड. प्रकाश घुले, ॲड. व्ही. आर. देशमुख, ॲड. एफ. आर. मुल्ला, ॲड. मनीष मर्दा, ॲड. पी. एल. पवार, ॲड. जी. एस. बुरकुल, ॲड. विठ्ठल क्षीरसागर, ॲड. किरण पडवळे, ॲड. ओंकार भुसे, ॲड. सौ. आर. जी. माने, ॲड. सावंत, ॲड. जी. एस. व्हणगोंडे, ॲड. आर. एस. रणे, ॲड. सौ. एच. एन. शेख, ॲड. सौ. टी. सी. मुजावर, ॲड. व्हि. आर. माळी, ॲड. सौ. ए. ए. भिंगे, ॲड. व्ही. के. मासाळ, ॲड. धनंजय हजारे, ॲड. बी. ए. पटवर्धन यांचेसह मंगळवेढा न्यायालयातील विधिज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी न्यायालयातील कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.