न्यूज लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढ्यातील नामांकित डॉक्टर पुष्पांजली शिंदे यांच्यामार्फत शपथग्रहण म्हणजे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात जो आदर्श निर्माण केला आहे तोच यापुढेही अविरत चालू ठेवणे आजच्या शपथ ग्रहणाच्या वेळी अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावत असताना आपल्याकडे असणाऱ्या संवाद व सेवा कौशल्याच्या जोरावर आपण भविष्यामध्ये यशस्वी होण्याची भावना बाळगणे गरजेचे आहे असे मत उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार यांनी व्यक्त केले.
मंगळवेढ्यातील संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजमध्ये लॅम्प लाइटिंग व ओथ टेकिंग सेरीमनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात प्राचार्य सुधीर पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. पुष्पांजली शिंदे होत्या. या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. मेघा अरुणकुमार महिंद्रकर उपस्थित होत्या.
सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी मयुरी क्षीरसागर, धनश्री बनसोडे, मालती बनसोडे, प्रणाली होवाळे, स्वाती लोखंडे यांनी अतिशय सुंदर स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य शरदिनी काळे यांनी केला.
प्राचार्य सुधीर पवार पुढे म्हणाले, नर्स म्हणून आपल्याकडे येणारा रुग्ण हा औषध उपचारांबरोबरच त्याला मिळणाऱ्या प्रेरणा व सेवेमुळे लवकर बरा होऊ शकतो म्हणून आपल्यातील भावना व जाणिवा यांचा योग्य असा समन्वय साधून आपण सेवा पार पाडावी व स्वतःला या देशाचा सुजाण नागरिक सिद्ध करावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य शरदिनी काळे यांनी केले. जगदीश सुतार यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रेयर सॉंग सादर केले यानंतर लॅम्प लाइटिंग करण्यात आली. याप्रसंगी डॉ. सौ.पुष्पांजली शिंदे, डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. मेघा महिंद्रकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी धनश्री बनसोडे, रंजना माने, वर्षा भोरकडे, दिपाली वाघमारे, गजानन गवळी, दर्शनी कोळी, अनिशा शेख, पूनम बंडगर, दिपाली वाघमारे, रंजना कांबळे, दिपाली चव्हाण, शालू कुशाळकर, रूपाली कुशाळकर, गीता काडे, मयुरी क्षीरसागर, सृष्टी कापसे, नम्रता सातपुते, स्वाती लोखंडे, वैशाली अवघडे, रूपाली खडतरे, किरण जाधव, मालती बनसोडे, प्रणाली होवाळे, कल्याणी खडतरे, प्रवीण पवार, एकनाथ हेगडे, नागनाथ गेजगे, आकाश ढोबळे, प्रथमेश लोखंडे, सत्यजित सोनवले, साक्षी पुजारी, पूजा गवळी, अश्विनी पाटील, विशाखा शिवशरण, गुरुनाथ कुंभार, शिवम्मा रताळकर, प्रतीक बनसोडे, रोहन भोसले, विनोद पाटील, अश्विनी पाटील, गीता खाडे, रूपाली साळुंखे, ऐश्वर्या बनसोडे, अर्पिता भोरकडे, विद्या राऊत, लक्ष्मी जाधव यांचेसह संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य शरदिनी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश सुतार, माधवी पवार, दरिबा खिलारे यांचेसह संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजचा कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी पवार यांनी केले तर जगदीश सुतार यांनी आभार मानले.