सोलापूर : सुरज राऊत
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे या उद्या गुरूवार दि. १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता पदयात्रेने त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची पदयात्रा काँग्रेस भवन, पानगल हायस्कूल, जिल्हा न्यायालय, बेडर पूल, जगदंबा चौक, सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे.
काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, फ्रंटल, सेल, विभागाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी – माजी सभापती, उपसभापती, सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषदेचे आजी -माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस भवन सोलापूर येथून निघणाऱ्या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार यांनी केले आहे.