टीम लोकमन मरवडे |
छत्रपती शिवाजी खो-खो क्लब मरवडे तालुका मंगळवेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर रविवारी 24 नोव्हेंबर 2024 रोजी 14 वर्षाखालील किशोर गटाची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने व मरवडे येथील छत्रपती खो-खो क्लब यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी किशोर खेळाडू 14 वर्षांखालील असावेत.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 11 हजार एक रुपये, द्वितीय 7 हजार एक रुपये, तृतीय 5 हजार एक रुपये व चतुर्थ पारितोषिक 3 हजार एक रुपये तसेच उत्कृष्ट खेळाडूंसाठीही एक हजार एक रुपयांची सहा वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघानी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन छत्रपती खो-खो क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक संघानी 23 नोव्हेंबरपर्यंत मिनाज इनामदार, भ्रमणध्वनी क्रमांक 9112110340 व सुदर्शन घुले भ्रमणध्वनी क्रमांक 9096927796 यांच्याकडे नोंदणी करावी.
या स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता मंगळवेढा पालिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढाचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, मरवडेचे मिस्टर सरपंच हरिदास चौधरी, हनुमान विद्यामंदीर प्रशालेचे मुख्याध्यापक हनमंत वगरे, रेल्वे पोलिस अधिकारी दामोदर घुले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरवडेचे मुख्याध्यापक निवृत्ती सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.