टीम लोकमन मंगळवेढा |
सोमवार दिनांक २० मे रोजी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बोराळे नाका विजापूर रोड, मंगळवेढा येथे मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी दिली.
सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर चालणार असून या शिबिरामध्ये कन्सल्टींग फिजिशियन व इंटेन्सिव्हीस्ट डॉ. मनीष बसंतवाणी, अस्थिरोग तज्ञ व गुडघे प्रत्यारोपण विशेषज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, बालरोग व नवजात शिशु तज्ञ डॉ. महेश कोनल्ली, डॉ. शशिकांत वाली, कान नाक घसा तज्ञ डॉ. दिपेंद्र हुली, त्वचा कॉस्मेटोलॉजिस्ट व लेसर तज्ञ डॉ. श्वेता होले-पाटील, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे हे तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत.
या शिबिरामध्ये ब्लड शुगर, रक्तदाब व गरजेनुसार इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) इत्यादी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. हे शिबिर मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बोराळे नाका, विजापूर रोड, मंगळवेढा जि. सोलापूर येथे होणार असून अधिक माहितीसाठी 9168101777, 9168301777, 9168 601777 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक भारत शिंदे, मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, समन्वयक संतोष कोळसे-पाटील, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ हेगडे, वाहन विभाग प्रमुख नितीन घाटुळे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे हॉस्पिटल समन्वयक गुरुनाथ शिवशरण, संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य शरदिनी काळे यांनी केले आहे.