टीम लोकमन मंगळवेढा |
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने आज मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या क्लब बुलेटीन एडिटर व या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट चेअरमन रो. सौ. अबोली बने व को-प्रोजेक्ट चेअरमन रो. सौ. रेणुका पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या असिस्टंट गव्हर्नर रो. सौ. पूनम देवदास, शांताबाई अरळी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जत येथील विभाग प्रमुख रो. डॉ. सौ. नयना पाटील-व्यवहारे, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूरचे प्राचार्य रो. डॉ. कैलास करांडे, साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वैराग येथील विभाग प्रमुख रो. डॉ. सुरेश व्यवहारे, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य रो. सुधीर पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे संचालक रो. मल्लय्या स्वामी, रो. असिफ मुल्ला, रो. प्रा. सागर पाटील, रो. कुलदीप रजपूत, रो. उमेश मर्दा, रो. श्रद्धा रत्नपारखी यांना रोटरी क्लबमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटेरियन ऑफ द मंथ या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी रो. अभिजीत बने यांनी दिली.
याच कार्यक्रमात ‘चला रोटरी समजून घेऊया’ या विषयावर रोटेरियन डॉ. सुरेश व्यवहारे, ‘चला आनंदी जगूया’ या विषयावर प्राचार्य रोटेरियन सुधीर पवार यांचे तर ‘आला उन्हाळा आरोग्य सांभाळा’ या विषयावर रोटेरीयन डॉ. नयना पाटील-व्यवहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीने महिलांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व फनी गेम्स देखील होणार आहेत अशी माहिती रोटरी क्लबच्या संचालिका रो. सौ. श्रद्धा रत्नपारखी व रो. सौ. अश्विनी रजपूत यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने खास महिलांसाठी आज मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेला हा हळदी कुंकू समारंभ जोगेश्वरी मंगल कार्यालय बायपास रोड मंगळवेढा येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांच्या सुरुची भोजनाची व्यवस्था देखील रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आली आहे.
रोटरी क्लब मंगळवेढा सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा आगळावेगळा सोहळा यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी या प्रकल्पाच्या प्रोजेक्ट चेअरमन रो. सौ. अबोली बने, को-प्रोजेक्ट चेअरमन रो. सौ. रेणुका पाटील, संचालिका रो. सौ. श्रद्धा रत्नपारखी, रो. सौ. अश्विनी रजपूत यांचेसह सौ. तसनिम मुल्ला, डॉ. सौ. स्वप्नाली नागणे, डॉ. सौ. असावरी घोडके, डॉ. सौ. प्रियदर्शनी बनसोडे, डॉ. सौ. अर्चना टकले, डॉ. सौ. मेघा महिंद्रकर, सौ. प्रियांका मर्दा, सौ. दिपाली पवार, सौ. महानंदा स्वामी, सौ. सीमा गाडवे, प्रा. सौ. नरगीस इनामदार, सौ. अंजली राजपुरोहित, सौ. गीता घाडगे, सौ. असमा शेख, सौ. करुणा शिवशरण, सौ. शैलजा फरकंडे, सौ. अंजली शिंदे, सौ. सरस्वती पाटील, सौ. सरोजिनी भुसे या सर्व प्रयत्न करीत आहेत.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट रोटेरियन अमोल रत्नपारखी व सेक्रेटरी रोटेरियन अभिजीत बने यांनी केले आहे.