टीम लोकमन मंगळवेढा |
इचलकरंजी जि. कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील मोफत भव्य प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २८, २९ व ३० जूनला ‘आयजीएम’ रुग्णालयात हे मोफत शिबिर संपन्न होणार आहे.
शिबिराचे हे २२ वे वर्ष आहे. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल अँड रिसर्च फाउंडेशन, नारायणदास दामोदर भंडारी फाउंडेशन, गिरीराज मदनगोपाल मोहता, गोयंका फाउंडेशन, रोटरी डिस्ट्रिक्ट ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी ॲन्स, इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी आदी संस्थाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. एस. पी. बजाज (दिल्ली), डॉ. रवींद्र ताह (लुधियाना), डॉ. हिरेन भट्ट (बडोदा), डॉ. पीयुष दोशी (बडोदा), डॉ. नीलेश पाटोदरा (राजकोट), डॉ. राजेंद्र गांधी (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होणार आहे.
या शिबिरात सहभाग घेणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रियापूर्व प्राथमिक तपासणी २४ जून रोजी होणार आहे. रुग्णांनी आपली नावे १५ जूनपर्यंत रोटरी श्रीमती सोनीदेवी रामविलास बाहेती सेवा केंद्र, दाते मळा इचलकरंजी जि. कोल्हापूर येथे नोंदवून अधिक माहिती घ्यावी. मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.