मंगळवेढ्यातील सीबीएसई पॅटर्न राबवणारी प्रसिद्ध व एकमेव प्रशाला म्हणजेच उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी एकमेव प्रशाला आहे. अगदी सर्वच क्षेत्रामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे . कला, क्रिडा, सांस्कृतिक, बौद्धिक, तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांना अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचविण्या करता प्रयत्न करणारी ही प्रशाला. समाजाला चांगला नागरिक देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे शिक्षकही प्रशालेस लाभले आहेत .
यावर्षी प्रशालेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार देखील मिळाला आहे.
दरवर्षी दहावीचा लागणारा शंभर टक्के निकाल तसेच मंथन,ओलंपियाड व स्कॉलरशिप सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सतत यश मिळत आहे . क्रिकेट सारख्या खेळाचे प्रशिक्षण प्रशालेमध्ये दिले जात आहे .त्याचप्रमाणे संगीतामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे .गणिताच्या विविध क्रियाकलापामध्ये विद्यार्थ्यांनी परफेक्ट व्हावे यासाठी अबॅकस चे क्लासेस प्रशालेमध्ये सुरु केले आहेत.
त्याचप्रमाणे प्रशालेमध्ये प्री प्राइमरी गटासाठी ग्रँड पेरेंट्स डे, रेड डे ,ग्रीन डे ,हेल्पर्स डे, नर्सरी साठी वंडरलैंड स्मार्ट क्लास कृतीयुक्त शिक्षण यासारखे उपक्रम आयोजित केले जातात.
प्रशालेमध्ये प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अत्याधुनिक सुविधायुक्त शिक्षण दिले जाते. सुसज्ज अशा वर्ग खोल्या ग्रंथालय व संगणक कक्ष मोठे क्रीडांगण आहे. शैक्षणिक सहलीबरोबर औद्योगिक भौगोलिक प्रकल्पांना भेटी दिल्या जातात .ग्रामीण भागातून शाळेमध्ये येण्या-जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय बसची सुविधा उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी यावर्षीच नव्याने उन्हाळी शिबिरामध्ये क्रिकेट, संगीत ,रांगोळी, चित्रकला 10 एप्रिल ते दहा 10 मे या कालावधीमध्ये छंद वर्गांच्या आयोजन करण्यात आले आहे. हे सर्वांसाठी खुले आहे.
अशा या गुणवैशिष्ट्यांबरोबर मंगळवेढ्यातील सुप्रसिद्ध दांपत्य आणि एमएमएस हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. नंदकुमार शिंदे आणि डॉ. पुष्पांजली शिंदे यांच्या प्रयत्नातून शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपात आली आहे. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी नागरिकांना या प्रशालेमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे .