टीम लोकमन मंगळवेढा |
शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोनू सूद चॅरिटी क्लब यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर ता. मंगळवेढा येथे वृक्षारोपण करण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव केंद्रामधील सर्व शाळांमध्ये 50 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर या ठिकाणी पाच झाडे लावण्यात आली व ती वाढविण्याची जबाबदारीही यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली.
या कार्यक्रमासाठी सोनू सूद चॅरिटी क्लबचे सोलापूरचे संस्थापक व चित्रकार विपुल मिरजकर व डॉ. मनोज देवकर हे रोपे घेऊन आले होते. याप्रसंगी मंगळवेढा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड, लक्ष्मी दहिवडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी शामराव सलगर, डोंगरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश साळुंखे, आंधळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण, लक्ष्मी दहिवडी केंद्राचे केंद्रप्रमुख सुदर्शन शेजाळ आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागातील विषयतज्ञ शरद पवार, अविनाश कांबळे, रमेश पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगरचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मोहिते, मुख्याध्यापिका संगीता पाटील, सहशिक्षिका ज्योती कलुबर्मे, सविता निळे, दत्तात्रय जाधव यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते. मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.