टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरातील विराज भगरे याच्या चौदाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून मंगळवेढा बसस्थानकात ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांची बसण्याची गैरसोय होऊ नये म्हणून दोन सिमेंटची बाकडी भगरे परिवाराने मंगळवेढा बसस्थानकास भेट दिली आहेत.
भगरे परिवार सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो. दादासाहेब भगरे, दिगंबर भगरे, गोपाळ भगरे, ज्ञानेश्वर भगरे हे बंधू विविध माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असतात. विराज भगरे हा ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे यांचा पुत्र असून त्याच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा बसस्थानकास प्रवाशांसाठी सिमेंट बाकडी भेट देऊन भगरे परिवाराने सामाजिक कार्याचा वारसा अविरत चालू ठेवला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक तथा स्थानक प्रमुख शरद वाघमारे, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, पत्रकार दिगंबर भगरे, विराज भगरे, गणेश गवळी, शरद पाटील, वाहक वांगीकर यांचेसह राज्य परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा आगारातील कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.