माडग्याळ : नेताजी खरात
कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेजमधील एका सरकारी रुग्णालयात शिकाऊ महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेवरून देशभरात निदर्शने सुरू आहेत. याचा निषेध म्हणून जत तालुक्यातील विविध संघटनेच्या डॉक्टरांनी ओपीडी विभाग एक दिवस (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद ठेवून महाराणा प्रताप चौकापासून शिवाजी पेठ मार्गे रॅली काढून तहसीलदार मार्फत प्रांतअधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात असे नमूद आहे की, दुर्घटनेचा तीव्र निश्चित करीत आहोत, आम्ही मागणी करतो की या कृतीच्या जबाबदार असलेल्या दोषीवर त्वरित आणि कठोर कारवाई करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, अशा अमानवीय घटनांना कोणत्याही परिस्थितीत माफी नाही आणि न्यायाची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आपणही आमच्या या आंदोलनात सामील व्हावे आणि या गंभीर प्रकरणी उच्चस्तरीय अधिकारी आणि प्रशासनापर्यंत पोहोचवावे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा मिळेल व पीडीतेला न्याय मिळेल.
यावेळी भारतीय वैद्यकीय संघटना (IMA), निम्हा (NIMHA), आयडीए (IDA), हिम्पा (HIMPA), यांच्याशी सल्लंघन असलेले डॉक्टर्स व ॲक्लाप (ACLAP) लॅबोरेटरी संघटनेचे सदस्य सामील होते. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जत तालुकाध्यक्ष डॉ. रोहन मोदी, डॉ. रवींद्र आरळी, डॉ. कैलास सनमडीकर, डॉ. मनोहर मोदी, डॉ. हरीश माने, डॉ. शरद पवार, डॉ. मदन बोर्गीकर, डॉ. विजय पाटील, डॉ. शेखर हिट्टी, डॉ. चंद्रमणी उमराणी, डॉ. प्रदीप शिंदे, डॉ. विद्याधर पाटील, डॉ. विवेकानंद राऊत, मोहसीन इनामदार, शिवानंद तेलसंग, नेताजी खरात यांच्यासह सर्व संघटनेतील पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.