टीम लोकमन मरवडे |
मरवडे तालुका मंगळवेढा येथे सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व छत्रपती खो-खो क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 14 वर्षाखालील किशोर गटाच्या जिल्ह्यास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये मरवडेच्या छत्रपती खो-खो क्लबने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 16 संघाने सहभाग घेतला होता. मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे यांचेहस्ते व मरवडेचे माजी सरपंच दादासाहेब पवार, निवृत्त रेल्वे पोलीस अधिकारी दामोदर घुले, माजी सरपंच अशोक पवार, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी डॉ. माणिक पवार, धनश्री परिवाराचे नेते संदीप सूर्यवंशी, उद्योगपती ॲड.राजाराम येडसे, शेतकरी संघटनेचे नेते दत्तात्रय गणपाटील, युवक नेते सचिन घुले, महेश गायकवाड, सोमनाथ टोमके या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
बाद पद्धतीने झालेल्या या स्पर्धेमध्ये छत्रपती खो-खो क्लब मरवडे, आदर्श खो-खो क्लब शेवते, लोकविकास खो खो क्लब वेळापूर व आढीव खोखो क्लब या संघांनी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. मरवडे संघाने आढीव संघाचा व शेवते संघांनी वेळापूर संघाचा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यामध्ये मरवडेच्या छत्रपती खो-खो क्लबने आदर्श खो-खो क्लब शेवते संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले.
सदर स्पर्धेसाठी जिल्हा असोसिएशनचे पंच म्हणून लखन कांबळे, हरिदास शिंदे यांचे तर विजय फटे, विजय कोटे, भैय्या कोळी या पंचांचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांगवे सर व गोकुळ कांबळे सर यांचेही विशेष सहकार्य लाभले.
सदरची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी छत्रपती खो खो क्लबचे सुदर्शन घुले, मिनाज इनामदार, रोहित कुंभार, उमाजी केंगार, नवनाथ डांगे, रोहन जाधव, नानासाहेब जाधव, नवनाथ बनसोडे, अभिनव पवार, रियाज इनामदार, ब्रह्मदेव कुंभार यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेत विजेतेपद पटकावल्या बद्दल छत्रपती खो-खो क्लबचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.