टीम लोकमन मंगळवेढा |
मरवडे ता. मंगळवेढा येथील रहिवासी व धुळे येथील विद्यावर्धिनी सभेचे डॉ. एम वाय वैद्य कला, प्रा. पी. डी. दलाल वाणिज्य आणि डॉ. डी. एस. शहा विज्ञान महाविद्यालयातील प्राचीन भाषा विभागाचे अधिव्याख्याते म्हणून कार्यरत असलेले प्रा. बाळासाहेब गणपाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.
प्रा. बाळासाहेब गणपाटील यांनी “कवी वत्सल ‘हाल’ संकलित गाथा सप्तशती मधील स्त्री जीवन” या विषयावर त्यांच्या पीएच.डीचे संशोधन केले आहे. सोलापूर येथील वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयाचे डॉ.महावीर शास्त्री हे त्यांचे मार्गदर्शक होते. मौखिक परीक्षेसाठी डॉ. व्ही. जी. कोरे, डॉ. बाळासाहेब भगरे, डॉ. आर. टी. पाटील उपस्थित होते.
प्रा. बाळासाहेब गणपाटील यांच्या या यशाबद्दल विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेड, सेक्रेटरी युवराज करनकाळ, उपाध्यक्ष केशव बहाळकर, व्हा. चेअरमन उदय शिनकर, जगदीश गायकवाड, प्राचार्य डॉ. मधुकर वानखेडे, उपप्राचार्य डॉ. विजय भुजाडे, डॉ. योगेश पाटील व डॉ. राजवीरेंद्रसिंग गावित यांनी अभिनंदन केले.
मरवडे गावच्या सुपुत्राला सोलापूर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल केल्याबद्दल मरवडे गावांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रा. बाळासाहेब गणपाटील यांचे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, माजी सरपंच दादासाहेब पवार, अशोक पवार, शिवाजी पवार, नितीन घुले, रजाकभाई मुजावर, उद्योजक दत्तात्रय गणपाटील, दशरथ गणपाटील, अनिल गणपाटील, युवक नेते सचिन घुले, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी माणिक पवार, प्राचार्य राजेंद्र पोतदार, संभाजी रोंगे सर, साहेबराव पवार सर, गोविंद चौधरी, भारत मासाळ सर, ज्ञानेश्वर कुंभार सर, माजी प्राचार्य अंबादास पवार सर, प्राचार्य औदुंबर गायकवाड, राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक सुरेश कुलकर्णी, झेप संवाद न्यूजचे संपादक श्रीकांत मेलगे, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी अभिजीत बने, ॲड.प्रकाश घुले, उद्योजक बसाप्पा येडसे, हेमंतकुमार सूर्यवंशी, ॲड. राजाराम येडसे, कामगार अधिकारी दत्तात्रय पवार, युवक नेते धन्यकुमार पाटील, संदीप सूर्यवंशी, प्राचार्य सुधीर पवार, प्रहारचे प्रा. संतोष पवार, नानासाहेब जाधव सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.