टीम लोकमन पाचगणी |
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 31 32 च्या 2023 24 च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. स्वाती हेरकळ यांनी पाचगणी जि. सातारा येथे आयोजित केलेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या समारंभात रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे माजी अध्यक्ष रो. रविंद्र बनकर यांची वर्ष 2023-24 चे बेस्ट प्रेसिडेंट म्हणून निवड करण्यात आली. अतिशय शानदार अशा कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
सोलापूर, सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बीड, जालना, नांदेड, हिंगोली व परभणी या जिल्ह्यांचा समवेश असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मधील 95 रोटरी क्लब मधून रवींद्र बनकर यांची सर्वोत्कृष्ट प्रेसिडेंट म्हणून निवड करण्यात आली आहे.
रविंद्र बनकर यांनी परिवर्तन प्रकल्प, क्लब प्रशासकीय कार्य, ग्लोबल ग्रँट प्रकल्प, मेंबरशीप, इंटरनॅशनल सर्व्हिस, सर्व्हिस प्रकल्प, युथ सर्व्हिस इत्यादी क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची योग्य दखल घेऊन त्यांना हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन या क्लबने अनेक सामाजिक उपक्रम राबवले व उत्कृष्ट कार्य केले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल रवि वदलामणी उपस्थित होते. या शानदार अशा सोहळ्यासाठी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या 11 जिल्ह्यांमधील रोटरीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनला पारिवर्तन क्लब अवार्डसह इतरही विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या सन्मानामुळे रो. रविंद्र बनकर आणि त्यांच्या क्लबच्या सर्व सदस्यांचा गौरव वाढवणारी घटना ठरली आहे. रो. रविंद्र बनकर यांच्या नेतृत्वाखाली क्लबने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांना मिळालेला सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे. या पुरस्काराबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट 31 32 च्या 2023-24 च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. स्वाती हेरकळ, 2024-25 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. सुरेश साबू, 2025-26 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे 2026-27 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेशभाई पटेल यांनी अभिनंदन केले.
बनकर यांना हा सन्मान प्राप्त झाल्याने लातूरमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मधील सर्व रोटरी क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी व रोटरी सदस्य व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.