टीम लोकमन मंगळवेढा |
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या संचालिका व इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेज मंगळवेढा या प्रशालेच्या उपप्राचार्या सौ. तेजस्विनी सुजित कदम यांची महाराष्ट्र शटलकॉक असोसिएशनच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तेजस्विनी कदम यांना जिल्हाध्यक्षपदी निवडीचे पत्र महाराष्ट्र शटलकॉक असोसिएशनच्या सचिवा अस्मिता मोगल यांनी दिले आहे. महाराष्ट्र राज्यात या खेळाचा प्रसार व प्रसिद्धी करण्यासाठी राज्य शटलकॉक असोसिएशनने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात शटलकॉक हा खेळ अधिकाधिक लोकप्रिय व्हावा तसेच जिल्हा अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी तेजस्विनी कदम यांची निवड महत्त्वाची ठरणार आहे.
शटलकॉक या खेळात सर्व वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. तसेच कमी खर्चिक खेळ असल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी हा एक चांगला पर्याय आहे. तसेच पुढील वर्षापासून भव्य राज्यस्तरीय शटलकॉक स्पर्धा, रेव्हेन्यू कप, पोलीस कप आंतरशालेय स्पर्धा, फ्रेंडशिप कप अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रा.तेजस्विनी कदम यांची सोलापूर जिल्हा शटलकॉक असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारण मंडळ मंगळवेढा या संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, संस्थेच्या अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. मीनाक्षी कदम, सचिवा डॉ. प्रियदर्शनी महाडिक, सहसचिव श्रीधर भोसले, खजिनदार राम नेहरवे, संचालक यतिराज वाकळे तसेच इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेज मंगळवेढा या प्रशालेचे प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने यांचेसह शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तेजस्विनी कदम विविध क्षेत्रात उमटवत आहेत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा…
प्रा. तेजस्विनी सुजित कदम या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्या, बालरंगभूमी परिषद मंगळवेढा शाखेच्या अध्यक्षा, शिवशंभो पतसंस्थेच्या चेअरमन, शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या संचालिका, इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या अशा अनेक महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत असून त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. नाशिक येथे सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय शटलकॉक स्पर्धेत इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेतील खेळाडूंनी प्रा.तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुंग यश मिळवले होते.