टीम लोकमन मंगळवेढा |
पुणे येथे झालेल्या पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या बापाने म्हणजेच विशाल आग्रवाल याने पोलीस कोठडीमध्ये कबूली दिली. त्याने अपघाताच्या रात्री अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली असल्याचे म्हटले आहे.
अपघाताप्रकरणी मुलाला जामीन मिळाल्यानंतर मोठा बांधकाम व्यावसायिक असलेला विशाल अग्रवाल फरार झाला होता. मात्र, पुणे पोलिसांनी त्याला शोधून काढत संभाजीनगरमधून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता विशाल आग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठीडी सुनावण्यात आली होती.
पोलीस कोठडी दरम्यान पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची या प्रकरणी कसून चौकशी केली. या चौकशीवेळी विशाल अग्रवालने अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली असल्याचे म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही कार 17 वर्षीय अल्पवयीन तरुण मुलगा चालवत होता, जो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. न्यायालयाने या अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती आणि त्याची सुटका केली होती. नंतर वाद वाढत गेल्याने न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालनिरीक्षण गृहात केली आहे. तर पोलिसांनी आरोपीच्या वडिलांसह चौघांना अटक केली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला आलिशान कारने दोन लोकांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवावा की नाही हे बाल न्याय मंडळ ठरवेल, असे आरोपीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले. नुकतेच पुण्यात पत्रकारांना माहिती देताना, आरोपीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, ‘ज्युवेनाइल जस्टिस ऍक्टमध्ये आरोपी चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ (CCL) हा अल्पवयीन मानायचा की प्रौढ हे ठरवण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास ९० दिवस लागतात.’