टीम लोकमन मरवडे |
मरवडे ता. मंगळवेढा येथील श्रीमती रखमाबाई दत्तू पवार यांचे आज पहाटे वार्धक्यामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मरवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त प्राचार्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते साहेबराव पवार सर यांच्या त्या मातोश्री तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मोहन पवार व मंगळवेढा येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.अश्विनी सतीश डोके यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचेवर मरवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, माजी सरपंच दादासाहेब पवार, अशोक भाऊ पवार, माजी प्राचार्य साहेबराव लेंडवे, अंबादास पवार, महादेव डांगे, संभाजी रोंगे, सेवानिवृत्त विस्ताराधिकारी डॉ. माणिक पवार, प्रा. बाळासाहेब माने, ज्ञानेश्वर कुंभार सर, उद्योजक बसाप्पा येडसे, कुमार सूर्यवंशी, संतोष गणपाटील, तंत्रस्नेही शिक्षक नानासाहेब जाधव, माचनूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच उमेश डोके यांचेसह मरवडे व परिसरातील ग्रामस्थ, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.