टीम लोकमन माडग्याळ |
संख ता. जत जि. सांगली येथील साहेबगौडा शिवाप्पा बिरादार (वय ५९) यांच्या छप्पर वजा पत्र्याच्या घराला अचानकपणे आग लागून अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संखपासून चार किलोमीटर अंतरावर साहेबगौडा शिवाप्पा बिरादार यांची वस्ती आहे. सकाळी सर्वजण शेतात गेले होते. घरात कोणीही नव्हते. साडेअकरा वाचण्याच्या सुमारास अचानकपणे राहत्या छप्परला आग लागली. छपरातून येणारा धुर पाहून पळत येऊन पाहिले असता सगळीकडे आगिने रुद्र रूप धारण केले होते. आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही. या आगीत रोख ७० हजार रुपये व ७० ग्रॅम सोने ५ लाख १० हजार रूपये, १४ ग्रॅम चांदी १२ हजार २०० रुपये व लहान मुलांचे दागिने तसेच ७० हजारचा लॅपटॉप, ८५ हजारचे कॅम्पुटर व दोन मोबाईल ३० हजार असे एकूण ९ लाख ९८ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच घरातील प्रकल्पग्रस्त दाखल, शाळेचे सर्व कागदपत्रे, रेशन कार्ड, धान्य, संसार उपयोगी साहित्य, भांडी, कपडे, वस्तू जळून सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे. बिराजदार कुटुंब उघड्यावर पडले असून निराधार झाले आहे. शासनाच्या आपतग्रस्त निधीतून मदत मिळावी अशी मागणी बिराजदार कुटुंबाकडून होत आहे. घटनेची माहिती गाव कामगार तलाठी विनायक भालटे यांना मिळताच घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला.