बेगमपुर : मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलच्या वतीने मोहोळ तालुक्यातील बेगमपुर या ठिकाणी ओपीडी विभाग सुरू केला असून यामुळे बेगमपूर व परिसरातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. शिर्के दांपत्याच्या ओपीडी विभागाच्या निर्णयाने बेगमपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोलाची भर पडली असल्याचे प्रतिपादन डाॅ.अमोल बुरांडे केले.
मोहोळ तालुक्यातील बेगमपुर येथे श्रीमती कमल साळुंखे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल ॲन्ड आयसीयुचा ओपीडी विभाग उद्घाटन सभारंभात डॉ. बुरांडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवप्रसाद मेडिकल शेजारी या ओपीडी विभागाचा शुभारंभ करण्यात आला. डाॅ.प्रविण नागणे यांच्या हस्ते या ओपीडी विभागाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार डाॅ.शरद शिर्के व डाॅ.प्रिती शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. डाॅ.प्रविण नागणे, डाॅ.प्रिती शिर्के, सोमनाथ कसबे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास भिमा शुगरचे माजी संचालक पांडूरंग काकडे, उपसरपंच केशव काकडे, डाॅ.अविनाश शिवशरण, डाॅ.नितिन सलगर, डाॅ.प्रसाद काकडे, डाॅ.किरण सलगर, डाॅ.सचिन जगताप, डाॅ.तोफिक मुलाणी, डाॅ.प्रदिप डोके, डाॅ.सुधाकर मोहोळे, डाॅ.सुचिता चव्हाण, डाॅ.निलिमा बुरांडे, दावल इनामदार, श्रीकांत काकडे, ओमसाई शिर्के, बाळासाहेब जामदार, सचिन कळमणकर, डॉ.अजित राजमाने आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद बिनवडे यांनी केले तर आभार डाॅ.प्रिती शिर्के यांनी मानले.