टीम लोकमन मंगळवेढा |
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे.
बसमधील 3 प्रवासी गंभीर जखमी तर 26 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. यातील सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरु आहेत. 11 मृतांपैकी 9 मृतांची ओळख पटली असून अन्य 2 मृत प्रवाशांची ओळख अद्यापही पटलेली नाही.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
या अपघाताच्या वृत्ताने राज्यासह देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक वक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर अपघाताची बातमी समजताच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची यांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असून जखमींना तातडीने आणि योग्य ते उपचार देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली
गोंदियातील शिवशाही बसचा दुर्दैवी अपघाताची बातमी समजताच आता राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली आहे. या अपघाताबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले आहेत त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्यावेत. असे निर्देश देण्यात आले आहेत.
आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शिवशाही बस अपघातात आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू
1) स्मिता सूर्यवंशी (वय 32) राहणार मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
2) मंगला राजेश लांजेवार (वय 60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार पिपरी जिल्हा भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे (वय 65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे (वय 65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे (वय 60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
7) आरिफ अजहर सय्यद (वय 42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
8) अजहर अली सय्यद (वय 55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
9) नयना विशाल मिटकरी (वय 35) राहणार बेसा जिल्हा नागपूर
10) अनोळखी पुरुष
11) अनोळखी पुरुष