टीम लोकमन सोलापूर |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काटेकोरपणे नियोजन करायला पाहिजे अशी अपेक्षा केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या आढावा बैठकीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शाळेचे गुणवत्ता वाढीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने हरीभाई देवकरण प्रशाला येथे जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, समग्रशिक्षाचे कनिष्ठ अभियंता व गटशिक्षणाधिकारी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी कादर शेख हे बोलत होते.
सदर बैठकीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २, आरटीआय मान्यता, विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान, शाळा भेटी, विविध उपक्रम आढावा ,सेमी इंग्रजी शाळा, आदर्श शाळा, पी एमश्री शाळा, आनंदी शनिवार, स्पर्धा परीक्षा, अमृतरसोई प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, आधार सरल यु डायस प्लस कामकाज, शैक्षणिक दर्जा वाढीबाबत नियोजन आदी विषयावर शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वठारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड, प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, रूपाली भावसार, लेखाधिकारी डॉ.वैभव राऊत, विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, सुदर्शन राठोड, हरीश राऊत, सुहास गुरव आदींनी मार्गदर्शन केले.