टीम लोकमन मंगळवेढा |
विश्वास, विकास आणि नम्रता ही त्रिसूत्री घेऊन यशस्वी वाटचाल करीत असलेल्या मंगळवेढ्यातील समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय गंगाधर माळी यांनी दिली.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे | उदास विचार वेच करी || हे ब्रीदवाक्य घेऊन पतसंस्थेची वाटचाल अतिशय यशस्वीरित्या होत असून २०२४ हे रौप्यमहोत्सवी वर्ष संस्था मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करीत आहे.
बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय गंगाधर माळी व त्यांच्या पत्नी सौ. मंगल दत्तात्रय माळी या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा होणार आहे. सकाळी ११ वाजता पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आवश्यकतेनुसार मोफत चष्मा दिला जाणार आहे. शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, मंगळवेढ्याच्या माजी नगराध्यक्षा सौ. अरुणाताई माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, माजी नगरसेवक अरुण किल्लेदार, माजी नगराध्यक्ष धनाजी खवतोडे, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष महादेव सत्याप्पा माळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम समता पतसंस्थेच्या कार्यालयात होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता निमंत्रित कवींची काव्यमैफल होणार आहे. यामध्ये कल्याणचे प्रशांत मोरे, छत्रपती संभाजीनगरचे नारायण पुरी, अंकलखोपच्या लता ऐवळे, यवतमाळचे आबेद शेख, सोलापूरचे तालीफ सोलापूरी, छत्रपती संभाजीनगरच्या गुंजन पाटील, मंगसुळीचे आबासाहेब पाटील, मंगळवेढ्याचे शिवाजी सातपुते, सांगोल्याचे शिवाजी बंडगर आणि मंगळवेढ्याचे इंद्रजीत घुले आदी मान्यवर कवी या मैफिलीत सहभागी होणार आहेत. यावेळी पतसंस्थेचे लेखाधिकारी कविवर्य धनंजय माळी यांच्या वाकुल्या या वात्रटिका संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या काव्य मैफिलीचे उद्घाटन मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, शब्दसुमणे मंचचे संस्थापक हेमंत रत्नपारखी, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गौरीशंकर बुरकुल, वीरशैव पतसंस्थेचे चेअरमन शैलेश हवनाळे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भोपाळ भगरे, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण जगताप, माजी नगरसेवक सोमनाथ माळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समता पतसंस्थेच्या कार्यालयाशेजारी प्रांत कार्यालयासमोर हा कार्यक्रम होणार आहे. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पतसंस्थेचे व्यवस्थापक राजु रामलिंग भीमदे यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हाईस चेअरमन सुधाकर कामन्ना माळी, संचालक नंदकुमार नरसाप्पा माळी, संजय राचाप्पा माळी, गोपीनाथ रामचंद्र माळी, संजय रामचंद्र माळी, शंकर बापू माळी, अशोक गुराप्पा माळी, संतोष गिरजाप्पा वाले, बजरंग भानुदास सुरवसे, राजेंद्र भानुदास घोडके, सौ.अश्विनी सागर माळी, सौ.अनिता राजेंद्र माळी, तज्ञ संचालक परमेश सिद्राम माळी, उत्तम किसन माळी संस्थेचे सल्लागार पांडुरंग राचाप्पा माळी, महादेव मारुती माळी, बाबा भीमराव माळी, तुकाराम आण्णासो धायगोंडे, विठोबा लक्ष्मण माळी, तुकाराम भीमराव कुदळे, श्रीशैल्य रामगोंडा कमते, दत्तात्रय भरत लाळे, भीमाशंकर महादेव तोडकरी, दिलीप माणिक उगाडे, श्रीशैल्य गिर्मल गोडसे, मोहन शंकर माळी, आमसिद्ध रेवणसिद्ध चौखंडे, नितीन शामसुंदर मर्दा, श्रीमंत शिवाजी माने व लेखाधिकारी धनंजय बिरमल माळी यांचे सह संस्थेचा कर्मचारी वर्ग प्रयत्नशील आहे.