आंधळगाव : गणेश पाटील
आंधळगाव ता. मंगळवेढा येथील मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले नडगेरी हॉस्पिटल आज पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
नागपूर रत्नागिरी महामार्गावर मंगळवेढा सांगोला रोडवर मंगळवेढा पासून १० किलोमीटर आणि सांगोला येथून २२ किलोमीटर अंतरावर आंधळगाव येथे महामार्गालगत सुसज्ज असे देखणे हॉस्पिटल नडगेरी परिवाराने ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी उभारल्याने आंधळगाव परिसरातील रुग्णांची चांगली सोय झाली असून ग्रामीण भागात अत्याधुनिक व उच्च दर्जाच्या सुविधा मिळत असल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आंधळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. भालचंद्र नडगेरी यांचे या परिसरात मोठे वलय आहे. डॉक्टरांनी सेवानिवृत्तीनंतर छोटेखानी क्लिनिक सुरू करून आंधळगाव परिसरातील रुग्णांना अतिशय चांगली वैद्यकीय सेवा दिली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. विजय व स्नुषा डॉ. स्मिता यांनी या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले आणि अल्पावधीतच हे नडगेरी हॉस्पिटल मंगळवेढा तालुक्यासह आसपासच्या परिसरात नावारूपाला आले.
डॉ. भालचंद्र नडगेरी हे MBBS असून वैद्यकीय सेवेत ४० वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. आंधळगाव परिसरात त्यांचा दबदबा असून प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे सुपुत्र डॉ. विजय भालचंद्र नडगेरी हे MBBS,MS असून ते जनरल सर्जन आहेत. स्नुषा डॉ. स्मिता विजय नडगेरी या MBBS,DGO असून त्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ आहेत. वंध्यत्व निवारण तज्ञ म्हणून त्यांची अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
रत्नागिरी नागपूर महामार्गालगत हॉस्पिटलची भव्य अशी सर्व सुविधांनी सुसज्ज दोन मजली अतिशय देखणी इमारत उभी आहे. या हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन, सर्जरी आणि स्त्रीरोग असे विभाग कार्यरत असून महिलांसाठी स्वतंत्र सुसज्ज असा स्त्रीरोग विभाग कार्यरत आहे. तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित व विनम्र असा कर्मचारी वर्ग, आपुलकीची वैद्यकीय सेवा मिळत असल्याने अल्पावधीतच हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. एक विश्वासू आणि खात्रीशीर वैद्यकीय उपचार मिळणारे केंद्र म्हणून या परिसरात नडगेरी हॉस्पिटलने आपली ओळख निर्माण केली आहे.
हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, मेंदू विकार, किडनी विकार, दमा व फुफ्फुसाचे विकार, पोटविकार, इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी), अद्यावत स्त्रीरोग विभाग, डिजिटल एक्स-रे, तातडीची वैद्यकीय सेवा (कॅज्युल्टी), सुसज्ज ऑपरेशन थिएटर, ॲक्सीडेंट व अस्थिरोग विभाग, तज्ञ डॉक्टरांच्या भेटी, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, मुतखड्याचे ऑपरेशन, अद्यावत जनरल वॉर्ड, सुसज्ज स्पेशल रूम, डीलक्स रूम, पॅथॉलॉजी लॅबरोटरी, मेडिकल स्टोअर, फ्रॅक्चर व हाडांच्या शस्त्रक्रिया, हर्निया, अपेंडिक्स, शरीरावरील व स्तनाच्या गाठींचे ऑपरेशन, लॅप्रोस्कोपी सर्जरी, दुर्बिणीद्वारे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, मुळव्याध निदान, उपचार व शस्त्रक्रिया इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
हॉस्पिटलमध्ये डॉ. स्मिता नडगेरी यांचे नेतृत्वात स्वतंत्र स्त्रीरोग विभाग कार्यरत असून गरोदर स्त्रियांची तपासणी, प्रसुतीपूर्व तपासणी व सल्ला, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज प्रसूतीगृह, NST (बाळाच्या हृदयाचा विद्युत स्पंदन आलेख), वंध्यत्व निवारण तपासणी व उपचार, गर्भाशयाची पिशवी काढणे, लॅप्रोस्कोपी सर्जरी, सरकारमान्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वारंवार होणारे नैसर्गिक गर्भपात तपासणी व उपचार, शासनमान्य गर्भपात केंद्र, पाळणा लांबविण्यासाठी अत्याधुनिक तांबी (कॉपर टी), दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध आहेत.
रुग्णांच्या विश्वासाच्या जोरावर नडगेरी हॉस्पिटलची अत्यंत यशस्वी वाटचाल सुरू असून रुग्णांना अधिकाधिक चांगल्या आधुनिक व उच्च दर्जाच्या सुविधा देण्याचा मानस हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय नडगेरी यांनी व्यक्त केला.