टीम लोकमन सोलापूर |
सुमतीबाई गोरे ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रातील उपक्रम शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. यावर्षी हा पुरस्कार सोलापूर येथील नूतन मराठी विद्यालयातील सहशिक्षिका सौ. रोहिणी सचिन चौधरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
रोहिणी चौधरी यांना प्राप्त झालेला हा पुरस्कार नुकताच झिरो एनर्जी शाळेतील शिक्षक दत्तात्रेय वारे सर आणि प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे यांच्याहस्ते देण्यात आला. अतिशय सुंदर अशा कार्यक्रमात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, 21 पुस्तकाचा संच, शाल व बुके देऊन सौ. रोहिणी चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.
रोहिणी चौधरी यांना राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार दिलीप माने, सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी पक्षनेते पांडुरंग चौधरी सर, रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे प्रेसिडेंट डॉ. अमित गायकवाड-पाटील, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी, रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर पुनम देवदास, २०२६-२७ चे डिस्टिक गव्हर्नर जयेशभाई पटेल, रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे IPP माऊली झांबरे, उद्योजक विक्रम बंडेवार, रोटरी क्लब ऑफ सोलापूर हर्मनीचे प्रेसिडेंट अविनाश मठपती डॉ. सुरेश व्यवहारे, डॉ. कीर्ती गोळवलकर, ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेचे संचालक सचिन चौधरी, सोलापूर शहर नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भालेकर, वीर कोतवाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मल्लिनाथ चौधरी, रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे सेक्रेटरी अक्षय पाटील यांनी अभिनंदन केले.
शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन सर, मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा जेधे व सर्व शिक्षक वृंद यांनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रोहिणी चौधरी यांचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.