टीम लोकमन मंगळवेढा |
ज्ञानाचा प्रकाश देण्या, दिवा अखंड जळतो……
जीवनाचा खरा अर्थ, शिक्षकांमुळेच कळतो….
५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 13 मे 1962 रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले. यावर्षी 5 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचे काही सहकारी आणि विद्यार्थ्यांना राधाकृष्णन यांना वाढदिवस साजरा करण्यास सांगितले. तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले की, शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी तुम्ही माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केलात तर मला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान वाटेल. डॉ राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या विचारांचा आदर करत हा दिवस सर्वत्र शाळा महाविद्यालय या ठिकाणी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा आजही सुरू आहे.
याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात प्रार्थना सभेमध्ये इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम नियोजित केला होता. त्यांच्या या कार्यक्रमांमध्ये शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रशालेच्या वतीने शिक्षकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन डॉ. नंदकुमार शिंदे यांनी केले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. नंदकुमार शिंदे यांना शालेय जीवनात गुरु म्हणून लाभलेल्या व मार्गदर्शन केलेल्या श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर माचनूर येथील गुरुवर्य यांना आमंत्रित करण्यात आले होते.
त्यामध्ये तत्कालीन मुख्याध्यापक कोंडुभैरी रामचंद्र भाऊ, अशोक मोरे सर, सौ. काटकर प्रतिभा, सौ.जगताप मीनाक्षी, शिंदे अशोक, बाबर प्रभाकर, सावळे नवनाथ, भास्कर कलुबर्मे, कलुबर्मे प्रभाकर, पवार सूर्यकांत, लंगडे मनोहर, धोकटे सूर्यकांत, कोंडुभैरी रामचंद्र, जगताप बाळासाहेब, बिनवडे दिलीप, धनंजय गायकवाड, महादेव फराटे, डॉ. जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशालेत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षिका, मावशी, शिपाई यांचा सत्कार करण्यात आला.
श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर माचनूर प्रशालेतील उपस्थित असणाऱ्या शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी सध्याच्या काळातील शिक्षणाची व्यवस्था, शिक्षकाची भूमिका व शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्याच्या गुणांना अधिक महत्त्व न देता तो सर्वगुणसंपन्न घडणं ही काळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थी घडवावा असे सांगितले व शिक्षकांना शुभेच्छा देखील दिल्या.
डॉ. नंदकुमार शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांच्या जीवनातील शिक्षकाची भूमिका व स्थान व भूतकाळात घडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रशालेकडून सर्वांसाठी स्नेहभोजनाचे नियोजन करण्यात आले होते. नेहमी लक्षात राहील अशा या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका अनिता केदार व पल्लवी सातपुते यांनी केले तर लक्ष्मण नागणे यांनी आभार मानले.
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे, प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.