टीम लोकमन मंगळवेढा |
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या वतीने आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी ‘नाच गं घुमा’ हा महिलांसाठीचा श्रावण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट रोटे. अमोल रत्नपारखी व सेक्रेटरी रोटे. अभिजीत बने यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी या क्लबचे नेहमीच नवनवीन असे समाज उपयोगी उपक्रम सुरू असतात. समाजातील विविध घटकांसाठी रोटरी नेहमीच कार्यरत असते. मंगळवेढ्यातील महिलांना भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने व जुने पारंपरिक खेळ नवीन पिढीला माहित व्हावेत. या उद्देशाने केवळ महिलांसाठी रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीने आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता बायपास रोडवर असणाऱ्या जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे नाच ग घुमा हा महिलांसाठीचा श्रावण सोहळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवेढा नगरपरिषदेच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट रोटे. अमोल रत्नपारखी भूषविणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक 3132 च्या असिस्टंट गव्हर्नर रोटे. पुनम देवदास, रोटरी डिस्ट्रिक्टच्या कल्चरर ॲक्टिव्हिटी डायरेक्टर रोटे. शांता येळंबकर या उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात महिलांच्या मनोरंजना सोबतच महिलांना पारंपारिक खेळ सण आणि उत्सव व त्याचे महत्त्वही समजणार आहे. याच कार्यक्रमात गायन, नृत्य, पारंपरिक खेळ, फॅशन शो, एकपात्री नाटक, प्रश्नमंजुषा याशिवाय ‘नाच ग घुमा’ या थीमवर मंगळवेढ्यातील महिला विशेष सादरीकरण करणार आहेत. शेवटी मंगळागौर देखील होणार आहे. याशिवाय याच कार्यक्रमात ठरणार आहे यावर्षीची ‘मंगळवेढा क्वीन’. या मंगळवेढा क्वीनला पैठणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात होणाऱ्या विविध खेळांचे डान्स, फॅशन शो व सर्व स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी संगीत, नृत्य व नाट्य क्षेत्रातील नामवंत परीक्षक उपलब्ध असणार आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेवर कार्यरत असणारे मान्यवर या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. या विविध स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक अशी बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शानदार अशा सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या वतीने देण्यात येणार आहेत.
रोटरी परिवारातील सदस्यांनी अतिशय मेहनतीने व अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनी अतिशय भव्य दिव्य असा नाच ग घुमा हा महिलांसाठीचा श्रावण सोहळा साकारला असून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. डॉ. सुरेश साबू, असिस्टंट गव्हर्नर रोटे. पुनम देवदास, रोटरी क्लब मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट रोटे. अमोल रत्नपारखी, सेक्रेटरी रोटे. अभिजीत बने यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब मंगळवेढा सिटीच्या कल्चरल ऍक्टिव्हिटी डायरेक्टर रोटे.अश्विनी कुलदीप रजपूत, प्रोजेक्ट चेअरमन रोटे. श्रद्धा अमोल रत्नपारखी यांच्या पुढाकाराने रोटे. अबोली अभिजीत बने, गीता दिलीप घाडगे, प्रियांका उमेश मर्दा, महानंदा मल्लय्या स्वामी, रोटे. रेणुका सागर पाटील, डॉ. मेघा अरुणकुमार महिंद्रकर, सरस्वती सुशील पाटील, दिपाली सुधीर पवार, तसनीम आसिफ मुल्ला, करुणा जनार्धन शिवशरण, डॉ. असावरी दत्तात्रेय घोडके, डॉ. प्रियदर्शनी सचिन बनसोडे, डॉ. अर्चना समाधान टकले, आसमा असिफ शेख, शैलजा दशरथ फरकंडे, अंजली गजानन शिंदे, नर्गिस चंगेजखान इनामदार, अंजली भरतसिंह राजपुरोहित, डॉ. स्वप्नाली निनाद नागणे, सिमा चेतन गाडवे, पौर्णिमा श्रीगणेश गायकवाड प्रयत्नशील आहेत.
थोर संतांची पवित्र भूमी असलेल्या आणि संत परंपरेचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक मंगळवेढा नगरीत रंगणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि नव्या पिढीतील तरुणी आणि महिलांनी भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे जतन करण्यासाठी उचललेला हा खारीचा वाटा असून त्यांच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी आपण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या वतीने करण्यात आले आहे.