टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.
राज्य सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असताना अशातच आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आणखी एक मोठी योजना जाहीर केली आहे.
10 हजार महिलांसाठी फायदेशीर योजना
17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार असून या योजनेअंतर्गत रिक्षा खरेदीची 20 टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. महिलांना रोजगार मिळावा या हेतूने राज्य सरकारने ही योजना आणली आहे.
याबाबत अजित पवार म्हणाले की, “आम्ही महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे. गुलाबी रिक्षा असे या योजनेचे नाव असून या योजनेतून 20 टक्के रक्कम महिलेने भरायची. तर 20 टक्के सरकार तर उर्वरित रक्कम बँक लोनमधून उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
जाणून घ्या या योजनेचे फायदे
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. यासाठी कमाल आर्थिक सहाय्य रु. 80,000 प्रदान करण्यात येतील.
जाणून घ्या या योजनेसाठी पात्रता
लाभार्थी महिला महाराष्ट्राची कायम रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याशिवाय लाभार्थी महिलांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असावे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
लाभार्थी महिलेकडे महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा, आधार कार्ड, चालक परवाना, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील आणि पासपोर्ट साइज फोटो असावा.