माडग्याळ : नेताजी खरात
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त भीमशक्ती मंडळ व ऑल इंडिया पॅथर सेना आसंगी ता. जत यांचेवतीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वैद्यांचा वैद्यरत्न हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
माडग्याळ येथील सुप्रसिद्ध डॉ.चंद्रशेखर हिट्टी यांनी माडग्याळ सारख्या ग्रामीण भागामध्ये हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करून या हॉस्पीटल मध्ये आत्याधुनिक सुविधा थ्रीडी, 4 डी अल्ट्रासाउंड सोनोग्राफी सेंटर, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ब्लड स्टोरेज सेंटर, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, डिजिटल एक्स-रे आदी सुविधा माफक दरात उपलब्ध करून रुग्णांची गैरसोय दूर केली आहे. डॉ. चंद्रमणी उमराणी हे माडग्याळ परिसरामध्ये गरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित आहेत. त्यांनी संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना माफक दरामध्ये दर्जेदार सेवा देत आहेत.
जत येथील डॉ. कैलास सनमडीकर हे कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून जत तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी कमल आर्थोपेडिक सेंटर अँन्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून शासकीय आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने मधून दुष्काळी जत तालुक्यातील रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रियांची सेवा दिली जात आहे. त्याचबरोबर त्यांनी जत तालुक्यातील रुग्णांना तात्काळ निदान व्हावे व पुढील उपचार वेळेत मिळावेत यासाठी सिटी स्कॅन व एमआरआय, सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर चालू करून तत्पर सेवा देत आहेत. त्याबद्दल त्यांना वैद्यकीय क्षेत्रातला वैद्यरत्न हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार दिनांक १० मे रोजी आसंगी ता. जत येथे सायंकाळी ७ वाजता आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील, सुजय (नाना) शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी आसंगी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.