आंधळगाव : गणेश पाटील
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आंधळगाव ता. मंगळवेढा यांचेवतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष बिरु शिंदे यांनी दिली.
शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता बामसेफचे प्रवक्ते शिवणकर साहेब यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन व संघर्ष त्याचे भारतीय समाज मनावर झालेले दूरगामी परिणाम या विषयावरती व्याख्यान आयोजित केले आहे.
रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण समारंभ होणार आहे. सोमवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता स्मरणशक्ती स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ७०१ रुपये, द्वितीय क्रमांक ५०१ रुपये, तृतीय क्रमांक ३०१ रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सकाळी १० वाजता निबंध स्पर्धेचे आयोजन केले असून यासाठी प्रथम क्रमांक ७०१ रुपये, द्वितीय क्रमांक ५०१ रुपये, तृतीय क्रमांक ३०१ रुपये अशी बक्षिसे आहेत. सायंकाळी ५ वाजता संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम ५०१ रुपये, द्वितीय ३०१ रुपये, तृतीय २०१ रुपये अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी ७ वाजता शाहीर देविदास बंगाळे आणि पार्टी यांचा भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार दिनांक १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता उत्कर्ष हॉटेलचे प्रोप्रायटर बंडू शिंदे व किरण दाजी शिंदे, निलेश औदुंबर क्षीरसागर यांचे सौजन्याने स्नेहभोजन संपन्न होणार आहे. सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक सोहळा आयोजित केला आहे.
सर्व कार्यक्रम भिमनगर आंधळगाव येथे होणार असून हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आंधळगाव चे अध्यक्ष बिरु शिंदे, उपाध्यक्ष गणेश शिंदे, संभाजी कांबळे, खजिनदार विश्वास शिंदे यांचेसह १४ एप्रिल ग्रुप आणि उत्सव समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.