मंगळवेढा तालुक्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्ष ,प्रहार अपंग संघटना, प्रहार शेतकरी संघटना यांची प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात बैठक संपन्न झाली.
या बैठकीत प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी यांनी भाजपाने बच्चु भाऊंचा फोटो सोलापूर लोकसभेच्या पोस्टरवरती कोणालाही न विचारता व विश्वासात न घेता टाकला आहे हे चुकीचे आहे असे मनोगत व्यक्त केले, यानंतर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राकेश पाटील यांनी अमरावतीमध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाचे उमेदवार नवनीत राणा हे आमचे दैवत पक्षप्रमुख बच्चू कडू यांच्यावर टीका करत आहेत ते आम्ही खपवून घेणार नाही असे सांगितले यानंतर प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी लोकसभा निवडणुकीत अजून बच्चू कडू यांनी आम्हाला कोणताही आदेश दिला नाही जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत शांत राहू असे सगळ्यांना सांगितले. यानंतर तालुका उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य रोहिदास कांबळे, सर्जेराव पाराध्ये यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बैठकीसाठी प्रहार प्रसिद्धीप्रमुख संभाजी मस्के , मंगळवेढा शहराध्यक्ष युवराज टेकाळे, माजी शहर अध्यक्ष आनंद गुंगे, महिला तालुका अध्यक्ष रुक्मिणी कोकरे ,शहराध्यक्ष सविता सुरवसे, वंदना माने ,अरुणा घाडगे ,जयश्री कोळी, सुवर्णा पाटील, शालन काळे, पिंटू कोळेकर, संतोष यादव ,प्रसाद सलगर ,निलेश इंगळे, शिवानंद नराळे ,ओंकार नागणे ,राम मेटकरी ,अंकुश सकट ,महादेव येडसे ,संजय माळी ,शिवाजी घुले, तानाजी पवार उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक गावातील शाखाप्रमुख , उपप्रमुख यांनी गर्दी केली होती या कार्यक्रमाला महिला व दिव्यांग व प्रहार सैनिकांनी मोठी उपस्थिती दाखवली होती या बैठकीचे सूत्रसंचालन प्रहार चे संपर्कप्रमुख शकीलभाई खाटीक यांनी केले तर आभार विजयकुमार तेली यांनी मानले.