टीम लोकमन उमदी |
मंगळवेढा येथील मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर हे प्रत्येक बुधवारी ओपीडीसाठी श्री पाटील हॉस्पिटल उमदी येथे येत असल्याची माहिती श्री पाटील हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
डॉ. अरुणकुमार महिंद्रकर यांचे शिक्षण MBBS, D.Ortho (DNB) Fellowship in Knee Replacement झाले असून ते सध्या मंगळवेढा येथील सुप्रसिद्ध मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून पूर्णवेळ कार्यरत आहेत. अल्पावधीतच ते मंगळवेढा तालुका व परिसरात लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. मंगळवेढा व परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींवर त्यांनी उपचार व शस्त्रक्रिया केल्या असून त्यांनी आपल्या कौशल्याने अल्पकाळात रुग्णांना आपलेसे केले आहे. मंगळवेढा परिसरात अत्यंत शांत संयमी व शिस्तबद्ध व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे.
डॉ. अरुणकुमार महिंद्रकर यांना मिरज येथील नामांकित डॉक्टर जी. एस. कुलकर्णी ऑर्थोपेडिक सेंटर मधील कामाचा प्रदीर्घ अनुभव असून हाडांच्या अनेक किचकट शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. सांधेरोपण शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्राविण्य असलेले डॉ. अरुणकुमार महिंद्रकर यांनी सांधेरोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नेतृत्वात मणक्याच्या शस्त्रक्रियाही मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत.
डॉ. अरुणकुमार महिंद्रकर हे प्रत्येक बुधवारी दुपारी ३ ते ५ यावेळेत श्री पाटील हॉस्पिटल, उमदी- पंढरपूर रोड, डीसीसी बँकेशेजारी, उमदी ता. जत जि. सांगली येथे ओपीडी साठी उपलब्ध असतात. तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पाटील हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.