सोलापूर : भाजपाने गेल्या दहा वर्षात देशातील जनतेला आश्वासने देऊन फसविले तेच म्हणतात की काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षात काय केले. आतापर्यंत जो देशाचा विकास झालेला आहे तो फक्त काँग्रेस पक्षानेच केलेला आहे म्हणून जनतेने सत्तर वर्षे काँग्रेस पक्षाला निवडून दिले आहे.
विश्रांती गायकवाड यांना सुध्दा भाजपाने फसविले परंतु त्यांना फसविले जात आहे हे लक्षात आले म्हणून ते परत काँग्रेस पक्षात सक्रिय झाले आहेत. आता सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून काँग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले.
काँग्रेस भवन सोलापूर येथे भाजपचे पदाधिकारी प्रा. विश्रांत गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब त्यांचा तिरंगी शाल घालून सत्कार केला.
त्याचबरोबर माढा येथील सौदागर जाधव, सांगोल्याचे सुनील भोरे यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी व पंढरपूर तालुक्यातील जालिंदर (नानासाहेब) देठे यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी तर सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी सुनील नागणे- पाटील यांची निवड करण्यात आली.त्यांना नियुक्तीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे आपल्याला एक -एक मत महत्वाचे आहे हे जानले पाहिजे. देशात जातीय शक्तीला वाढू देऊ नका. देशाचे संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष सत्तेवर आला पाहिजे. सोलापूरचा विकास होण्यासाठी प्रणितीताई शिंदे यांना प्रचंड मताने विजय करा असे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अँड. नंदकुमार पवार यांनी केले.
काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळत असते. थोडा धीर धरावा लागतो. विश्रांत गायकवाड यांनी त्यांच्या बक्षीहिप्पगे गावात प्रणितीताई शिंदे जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करावा असे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.
बैठकीचे प्रास्ताविक अशोक निम्बर्गी यांनी केले तर सूत्रसंचालन तिरुपती परकीपडला यांनी केले.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, भीमाशंकर जमादार, प्रदेश सचिव पंडित सातपुते, माजी महापौर संजय हेमगड्डी, अशोक निम्बर्गी सर, प्रा. सिद्राम सलवदे, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, मोतीराम चव्हाण, भीमाशंकर टेकाळे, सौदागर जाधव, सुनील भोरे, जालिंदर देठे, सुनील नागणे, सचिन खैरे पाटील, धनेश अचलरे, अशोक चेळेकर, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे,सुमन जाधव, शोभा बोबडे, मनोज माळी, उमेश सुरते, अप्पू शेख, राजू ऊराडे, नागेश बिराजदार, मामा फलटणकर, अंजली मंगवडेकर, वर्षा अतनुरे, चंदाताई काळे, सुनीता बेरा, मुमताज तांबोळी, सलीम शेख, अनिता भालेराव, देवेंद्र सैनसाखळे, आदी उपस्थित होते.